Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपुरात खड्ड्यात पडून चिमुकल्याचा तर नाशिकमध्ये कपाट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

 नागपुरात खड्ड्याने चिमुकल्याचा बळी घेतला तर नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळले.

नागपुरात खड्ड्यात पडून चिमुकल्याचा तर नाशिकमध्ये कपाट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

 नागपूर, नाशिक : नागपुरात खड्ड्याने चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पाच वर्षीय आर्यन राऊतचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. नागपूरच्या दवलामेटी परिसरात ही घटना घडलीय. तर नाशिकमध्ये  सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आर्यन काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून घराजवळील मैदानाजळून बेपत्ता झाला होता. रात्रभर त्याचा शोध घेतला गेला. तो बेपत्ता असल्याची तक्रारही वाजी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आर्यन सापडला नव्हता. मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह ग्राम पंचायतीकडून सुरू केलेल्या समाजभवन निर्माण कार्याच्या स्थळावर सापडला. समाजभवन बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सध्या पावसाचं पाणी साचलंय. त्यात पडून आर्यनचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये ही दुर्घटना घडली. जयेश अवतार असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Read More